सांगली न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांच्या विरोधात सांगलीतील विटा पोलीस स्टेशनमध्ये (Vita Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथे बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी (19 जुलै) रोजी संपन्न झाला होता. या सोहळ्यादरम्यान लोकांचा जमाव झाला होता. गर्दी जमवल्याप्रकरणी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांच्या विरोधात हा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून बहिर्जी नाईक यांचं स्मारक उभारण्यात येत आहे.
या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला आहे. या सोहळा कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन पद्धतीनं सहभागी झाले होते.
तर या सोहळा कार्यक्रमाचे निमंत्रक आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अनेक हिरे होते.
याच हिरकांच्या कोंदणातील एक हिरा म्हणजे बहिर्जी नाईक. बुद्धीचातुर्य, शौर्य, स्वामीनिष्ठा, प्रखर राष्ट्रप्रेम या गुणांचा अपूर्व संगम म्हणजे बहिर्जी नाईक’, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी बहिर्जी नाईक यांच्या शौर्याला नमन केलं होतं.
Web Title : BJP MLA Gopichand Padalkar | case file against mla gopichand padalkar for violating disaster management act in sangli
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Talegaon Dabhade Police | प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई, 39 लाखांचा मुद्देमाल जप्त