पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Chinchwad Coronavirus) दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही शहराला दिलासा देणारी बाब आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 214 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 02 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 214 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 60 हजार 665 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 250 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 55 हजार 040 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 1 हजार 319 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 02 रुग्ण शहरातील आहेत. तर 01 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (दि.11) शहरामध्ये 24 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 23 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 21 हजार 177 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 7 लाख 83 हजार 580 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title : pimpri corona 214 new corona patients in pimpri chinchwad in last 24 hours
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update