बहुजननामा ऑनलाइन टीम – पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) हद्दीमध्ये वाहन चोरीच्या (Two Wheeler Theft)) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील विविध भागामधून एक लाख 35 हजार रुपये किमतीच्या 5 दुचाकी चोरीला गेल्या असून याप्रकरणी(Theft) संबंधित पोलीस ठाण्यात (Police Station) शनिवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहनांची चोरी होण्याचे प्रमाण वाढत असल्याने वाहन चालक धास्तावले आहेत.
भोसरी येथील दत्तात्रय तुळशीराम फुले (वय-50) यांची 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी नाशिक फाटा येथील उड्डाणपुलाखाली पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरुन नेली. फुले यांनी यासंदर्भात भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकींची चोरी झाल्या आहेत. महेश रामचंद्र पोकळे (वय-29 रा. घोरपडी), नितीन राजकपूर खंडारे (वय-33 रा. जुनी सांगवी) आणि नवनाथ तुकाराम शिंदे (वय-35 रा. पिंपरी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची फिर्याद दिली आहे. पोकळे यांची 50 हजार रुपयांची दुचाकी सुदर्शन नगर पिंपळे गुरव येथून चोरीला गेली आहे. खंडारे यांची 25 हजार रुपयांची दुचाकी जयमाला नगर, जुनी सांगवी येथून तर शिंदे यांची 25 हजार रुपयांची दुचाकी पिंपळे सौदागर येथून चोरीला गेली आहे.
गजानन केरबाजी घोडके (वय-36 रा. आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी त्यांची 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी खडी मशीन रोड, चऱ्होली फाटा येथे एका झाडाखाली पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली.
चारचाकी वाहनांच्या सायलेन्सरची चोरी
चारचाकी वाहनांचे सायलेन्सर चोरीला गेल्याचे दोन प्रकार घडले आहेत. दामिनी सुरवाडकर यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी त्यांच्या चारचाकी गाडीचा 12 हजार रुपये किंमतीचा सायलेन्सर चोरून नेला. तर दुसरी घटना भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्रवीण पिंगळे यांच्या चारचाकीचा एक हजार रुपयांचा सायलेन्सर अज्ञात चोरट्याने चोरून नेला. पिंगळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.