पिंपरी/पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 370 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 330 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (शनिवार) शहरामध्ये चार कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे.
गेल्या 24 तासात शहरामध्ये 370 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 5 हजार 281 वर पोहचली आहे. आज 330 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 1 लाख 073 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण घटले असले तरी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे.
गेल्या 24 तासामध्ये पालिका चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले रुग्ण चिंचवड, वाल्हेकरवाडी, पिंपरी येथील आहेत. आतापर्यंत शहरात 2613 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1841 शहरातील तर 772 पालिका हद्दीबाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 831 रुग्ण अॅक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 172 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 142 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्रभाग निहाय आढळून आलेले रुग्ण
अ प्रभाग – 43, ब प्रभाग – 60, क प्रभाग – 34, ड प्रभाग – 72, ड प्रभाग -72, इ प्रभाग – 62, फ प्रभाग – 51, ग प्रभाग – 22, ह प्रभाग – 26