पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad city) कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने शहरामध्ये लॉकडाऊनचे (Lockdown) नियम शिथिल करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वेगाने घट होत आहे. याशिवाय रुग्ण बरे होत असल्याने सक्रिय रुग्णांची (Active patient) संख्या घटली आहे. तसेच अॅक्टिव्ह (Active) रुग्णांची संख्या दीड हजारांच्या आत आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये (PCMC) 237 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 09 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 02 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 54 हजार 526 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 476 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 49 हजार 015 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.
अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट
शहरामध्ये सध्या 1 हजार 276 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 09 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 05 रुग्ण शहरातील आहेत. तर 04 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4235 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कृपया हे देखील वाचा:
Health Infrastructure | हेल्थ सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकार देणार 50,000 कोटी, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्लॅन?