अहमदनगर (Ahmednagar News) : बहुजननामा ऑनलाईन – अहमदनगर (Ahmednagar News) जिल्ह्यातल्या अकोले येथील एका शिंदे कुटंबीयांवर (Shinde family) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आठ दिवसापूर्वी झालेल्या आईच्या निधनापाठोपाठ मुलीने देखील जगाचा निरोप घेतला आहे. सुकृता शिंदे असे त्या मुलीचे नाव आहे. सुकृता हिने पत्रकारीतेमध्ये पदविका शिक्षण प्राप्त केलं होतं. विशेष म्हणजे सुकृता ही अकोले तालुक्यातील पहिली महिला पत्रकार आज तिने जगाचा निरोप घेतला आहे.
अकोले महाविद्यालयातील (Akole College) सेवा निवृत्त उपप्राचार्य, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुनिल शिंदे (Jyeshtha Sahityak Pvt. Dr. Sunil Shinde) यांची कन्या सुकृता हिचे आज पहाटे कोरोनामुळे (corona) निधन झाले. आई सुनिताताई शिंदे यांच्या दशक्रिया विधीच्या आदल्याच दिवशी मुलीलाही कोरोनाशी लढताना अपयश आलं. रुग्णालयात उपचार घेताना कोरोना विरुद्धची झुंज अखेर अपयशी ठरली. तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर देखील तिला वाचविण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र, तिला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. या निधनामुळे अकोले तालुक्यात (Akole taluka) दुःख व्यक्त होत आहे.
मागील वर्षी सुकृताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संगमनेर कॉलेजमधून यश संपादन केले होते.
जागतिक महिला दिन, महिलांना कायदे विषयक जनजागृती या संदर्भात तिचे लेख देखील प्रसिद्ध झाले होते.
विशेष म्हणजे अकोले तालुक्याच्या इतिहासात पहिली महिला पत्रकार म्हणून ती आपला ठसा उमटवत होती.
तिचे शिक्षण एम. ए मराठी, डी. एड अभ्यासक्रम यानंतर तिला पत्रकारिता विषयाची विशेष आवड होती.
म्हणून तिने पत्रकारिता अभ्यासक्रम ही पूर्ण केला होता.
दरम्यान, सुकृता हिचे लग्न ठरले होते. 4 मे (2021) रोजी तिचा विवाह होणार होता.
मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लग्न पुढे ढकलले होते. मात्र कोरोनामुळे लग्नाआधीच काळाने घाला घातला.
कृपया हे देखील वाचा:
Maratha kranti Andolan Kolhapur | ‘पाऊस’ मराठा समाजाच्या लढ्याला साक्षीदार; जाणून घ्या आंदोलनाच्या मागण्या
Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 321 रूग्ण ‘कोरोना’मुक्त
CBSE 12th Class Result 2021 : सीबीएसई 12वीच्या रिझल्टसाठी अवलंबणार 30:30:40 फॉर्म्युला? वाचा डिटेल्स
Pune News | ‘या’ फरार सराईत चोरट्याचा पोलीस घेत आहेत शोध, वेशांतर करण्यात आहे पटाईत