बहुजननामा ऑनलाइन टीम – मीच घरकुलाचा डॉन आहे, कोणी माझ्या नादी लागला तर त्याला खल्लास करीन, अशी धमकी देऊन दहशत पसरवली. तसेच कोयत्याने एकाला जिवे मारण्याचा(vehicles vandalized) प्रयत्न केला. त्यानंतर कोयत्याने 13 वाहनांची तोडफोड करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार घरकुल चिखली येथे बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडला.
नुरमोहम्मद उर्फ गुल्लू हमीद सय्यद (वय-18 रा. घरकुल, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आकाश बालाजी गायकवाड (वय-19 रा. घरकुल, चिखली) याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश गायकवाड रात्री घरी असताना कोणीतरी आरडाओरडा करीत असल्याच ऐकून गायकवाड आणि इतर सभासद इमारतीच्या खाली आले. त्यावेळी आरोपी हा हातात कोयता घेऊन दहशत पसरवित होता. आता मीच घरकुलाचा डॉन आहे, असे म्हणत त्याने जीवे मारण्याची धमकी दिली.
आरोपीने धमकी देत गाड्यांची तोडफोड केली. त्यावेळी फिर्यादी त्याला जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपीने फिर्यादीला कोयता जोरात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी सहा दुचाकी, तीन तीनचाकी आणि चार चारचाकी, अशी एकूण 13 वाहनांची तोडफोड करुन 44 हजार 500 रुपयांचे नुकसान केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोये करत आहेत.