नवी दिल्ली :वृत्तसंस्था – युट्युब वर चॅनेल चालवून सर्वाधिक कमाई करणाऱ्या फेलिक्स केजेलबर्ग याने आपली गर्लफ्रेंड मार्जिया बिसगोन हिच्याशी विवाह केला आहे. त्यांनी आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले असून त्यावर लाईक्सचा वर्षाव होत आहे. फेलिक्स केजेलबर्ग उर्फ प्यूडीपी याने लंडनमधील एका शानदार समारंभात आपल्या कुटुंबियांसह लग्नगाठ बांधली.
मागील आठ वर्षांपासून दोघे एकत्र होते. एका वेबसाईटवर चॅटिंग दरम्यान दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर ट्विट करून त्याने आपला आनंद व्यक्त केला. त्याने लिहिले कि,मी खूप खुश असून एका अतिशय उत्तम महिलेबरोबर मी माझे जीवन व्यथित करणार आहे. त्याचबरोबर त्याच्या पत्नीने मार्जिया बिसगोन हिनेदेखील इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून म्हटले कि, काल १९ ऑगस्ट रोजी ठीक ८ वर्षांपूर्वी आम्ही एकमेकांना भेटलो होतो. त्यामुळे आम्ही याच दिवशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मार्जिया बिसगोन हि एक इंटरनेट सेलिब्रेटी असून फॅशन डिझायनर देखील आहे.