बहुजननामा ऑनलाईन – पाकिस्तानचे मंत्री फवाद हुसेन यांनी केलेल्या ट्विटवर भारतीय ट्विटर युजर्सनी दिलेल्या उत्तराने तेच तोंडावर पडले आहेत. भारतीय युजर्सनी त्यांना ” आपल्याकडे पैसै नाहीत, त्याबद्दल आपण बोलू नये, असे उत्तर दिले आहेत तर एका युजरने तर “स्वागतासाठी जितके पैसे लागले असतील तितकी पाकिस्तानची लायकीही नाही” असे उत्तर दिले आहे.
झाले असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. पॅरिसला पोहचल्यावर फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री स्वतः त्यांचे स्वागत करण्यासाठी तेथे पोहचले. तेव्हा तिथे काही भारतीय वंशाचे लोकही होते. त्यांनीही मोदीचे स्वागत केले. त्यांच्या स्वागताचा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर करण्यात आला. तेव्हा फवाद हुसेन यांनी त्या ट्विवर रिट्विट करत “या नाटकावर किती पैसे खर्च केले आहेत ?” असे लिहीले. त्यावर संतापलेल्या भारतीय ट्विटर युजर्सनी फवाद यांच्यावर निशाना साधत अशी उत्तरे दिली. भारतीयांनी दिलेल्या या उत्तरांनी पाकिस्तानी मंत्र्यांचा तिळपापड होत असल्याचे दिसत आहे.
खरेतर पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. देश कर्जात बुडाला आहे. म्हणूनच लोक पाकिस्तानची पैशांवरुन थट्टा करत आहेत. संतापलेल्या काही युजर्सनी असेही लिहीले आहे की, आपण पैशांनी प्रेम आणि आदर खरेदी करु शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही कश्मीरवर ताबा मिळवू शकत नाही. पण पाकिस्तानला हे कधीही समजणार नाही. काही दिवसांपुर्वी जेव्हा पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री शाह महमुद कुरेशी चीन दौऱ्यावर होते. तेव्हा हॉटेलमध्ये पोहचल्यावर त्यांचे स्वागत झाले. हा व्हिडीओही शेअर करण्यात आला होता. मात्र त्यावेळी लोकांनी त्यांचवर थू-थू केली होती.