नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी 7 फेब्रुवारी हा दिवस कधी ना विसरण्या सारखा आहे. आजच्या 22 वर्षांपूर्वी 1999 मध्ये अनिल कुंबळेने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात 10 गडी बाद केले. असे करणारा तो जगातील दुसरा गोलंदाज ठरला. त्याआधी इंग्लंडचा ऑफस्पिनर जिम लेकरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 1956 च्या मँचेस्टर कसोटी सामन्यात सर्व 10 बळी (51.2-23-53-10) घेतले.
लेगस्पिनर कुंबळेने 4 ते 7 फेब्रुवारी 1999 दरम्यान दिल्लीच्या तत्कालीन फिरोजशाह कोटला स्टेडियमवर (आता अरुण जेटली स्टेडियम) दिल्ली येथे झालेल्या सामन्यात 26.3 षटकांत 9 मेडनसह 74 धावा देऊन 10 बळी घेतले. त्या सामन्यात 420 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तान संघाचा सलामीवीर सईद अन्वर आणि शाहिद आफ्रिदीने 101 धावांची भर घातली, परंतु संपूर्ण संघ 207 धावा करू शकला आणि भारताने पाकिस्तानला 212 धावांनी पराभूत केले.
#OnThisDay in 1999, #TeamIndia spin legend @anilkumble1074 became the first Indian bowler and second overall to scalp all the 10 wickets in a Test innings. 👏👏
Watch that fantastic bowling display 🎥👇 pic.twitter.com/OvanaqP4nU
— BCCI (@BCCI) February 7, 2021
प्रथम कुंबळेने शाहिद आफ्रिदीला बाद केले व त्यानंतर सर्व विकेट घेतल्या. जेव्हा कुंबळेने 9 विकेट्स घेतल्या होत्या, तेव्हा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने , दुसऱ्या टोकाकडून गोलंदाजी करण्याऱ्या जवागल श्रीनाथला ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करण्यास सांगितले, जेणेकरून त्याला विकेट मिळू नये आणि कुंबळेला शेवटची विकेट मिळू शकेल.
पाकिस्तानचे विकेट :
101 – 1 शाहिद आफ्रिदी (41) नयन मोंगियाला झेलबाद झाला.
101 – 2 इजाज अहमदला (0) एलबीडब्ल्यू करून पॅव्हेलियनमध्ये पाठविले
115 – 3 इंझमाम उल हक (6) बोल्ड केले
115 – 4 मो जोसेफ (0) एलबीडब्ल्यू केले
127 – 5 ने मोईन खानला (3) सौरव गांगुलीने झेलबाद केले
128 – 6 सईद अन्वरला (69) व्हीव्हीएस लक्ष्मणने केले झेलबाद
186 – 7 सलीम मलिक (15) बोल्ड .
198 – 8 मुश्ताक अहमद (1) राहुल द्रविडने झेलबाद केले
198 – 9 सकलेन मुश्ताक (0) एलबीडब्ल्यू
207- 10 वसीम अक्रम (37) लक्ष्मणने झेलबाद केले
वकार युनूस 7धावा करुन नाबाद राहिला.
29 धावा अतिरिक्त ((बी 15, एलबी 2, एनबी 10, डब्ल्यू 2)
पाकिस्तान – 207 धावा ऑल आऊट ( 60.3 षटक)
अनिल कुंबळे – 26.3 षटके, 9 मैडन, 74 धावा, 10 विकेट