पिंपरी/ पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरात गेल्या 24 तासात 108 नवीन कोरोना (CoronaVirus) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 163 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज (रविवार) शहरामध्ये एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकिय विभागाने दिली आहे.
गेल्या 24 तासात शहरामध्ये 108 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 940 वर पोहचली आहे. आज 163 रुग्णांची दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 97 हजार 207 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात रुग्णांची संख्या घटत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
गेल्या 24 तासामध्ये पालिका हद्दीबाहेरील एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेला रुग्ण चिंबळी येथील रहिवासी आहेत. आतापर्यंत शहरात 2588 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये 1821 शहरातील तर 767 पालिका हद्दीबाहेरील आहेत. सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 582 रुग्ण अॅक्टिव्ह (Active) असून त्यांच्यावर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिंपरी महापालीका हद्दीबाहेरील 94 रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पिंपरी चिंचवडमधील 102 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.