जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – यावल तालुक्यातील डोंगर कठोरा दलितवस्ती सुधार योजना अंतर्गत डोंगर कठोऱ्यात सन २०१७/१८ या वित्तीय वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर मध्ये अंतर्गत कॉँक्रीटीकरणासाठी ५ लाखांचा निधी समाज कल्याण विभाग जळगाव यांनी दिला होता. परंतु ग्रामपंचायत यांनी दलितवस्ती सुधार योजना अंतर्गतचा निधी इतरत्र ठिकाणी खर्च केला असून त्या कामांची चौकशी करण्यासाठी दि. २ जुलै २०१८ रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी जळगाव यांच्या कडे सामाजिक कार्यकर्ते आनंद मेघे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.
त्या कामांची चौकशी यावल विस्तार अधिकारी (ग्राम पंचायत विभाग) किशोर सपकाळे यावल यांनी चौकशी केली असता चौकशी अंती डोंगर कठोरा सन २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीच्या (नवबौध्दाची) लोकसंख्या ६४४ असुन डोंगर कठोरा येथे एकच दलित वस्ती आहे आणि काम त्या ठिकाणी झालेले आहे. तसाच अभिप्राय समाज कल्याण अधिकारी जळगाव यांना दि.१ नोव्हेंबर २०१८ सादर करण्यात आला होता.
त्या अभिप्रायाचे अवलोकन त्यांनी केले असता त्यांना काम दलितवस्ती मध्ये झाले नाही म्हणून गटविकास अधिकारी यावल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि त्या कार्यवाही केलेल्या चा अहवाल तात्काळ या कार्यालयात सादर करण्यात यावा तरी प्रभारी गटविकास अधिकारी यावल, चौकशी अधिकारी विस्तार अधिकारी यांचा पदभार एकाच अधिकाऱ्याकडे असल्याने चौकशी, कार्यवाही करण्यास दिरंगाई होत आहे.