यवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन – १४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकींमधील भाजपने दिलेले आश्वासन पळाले नाही. महामंडळावर अध्यक्ष पदाची नियक्ती बाबत कार्यकत्यामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. गेल्या निवडुकीमध्ये आरपीआय (ए) गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाला निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतले होते. यंदा पक्षाला विचारले गेले नसल्याने पक्षाच्या विदर्भ कार्यकारिणीची बैठक रविवार २४ मार्चला यवतमाळमधील ‘ एकविरा हॉटेल’ येथे दुपारी होत आहे. यात विदर्भातील कार्यकर्ते वेगळी भूमिका घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भाजपने आमच्या पक्षाला एकच महामंडळ दिले. करारानुसार तसा सहभाग दिला नाही. परंतु भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटा मिळाला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आम्ही कार्यकर्त्यांनी अवमानही सहन केला. मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस व आठवले यांच्यात बैठक झाल्यानंतर मुंबईतील १ जागा देण्याचेआश्वासनही दिले होते. मात्र ते आश्वासन हवेतच विरघळण्याची शक्यता आहे.
भाजप टाळाटाळ करीत असल्याने आरपीआय (ए ) गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमिवर यवतमाळ येथे ही बैठक होत आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर असतील. बैठकीत माजी आमदार अनिल गोंडाणे. नगरसेवक प्रकाश गोंडाणे. महेंद्र मानकर. नवनीत महाजन.राजू बहादुरे. सुधाकर तायडे. मोहन भोयर. अशोक नागदिवे. डॉ. भीमराव म्हस्के या पदाधिकाऱ्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते राजन वाघमारे यांनी कळविले आहे.