बहुजननामा ऑनलाइन टीम – फायनान्शियल सर्व्हिसेस प्लॅटफॉर्म पेटीएम (Paytm) आता छोट्या व्यावसायिकांना कमी व्याजदरात 5,00,000 रुपयांपर्यंतचे लोन (Loan Through Paytm) देण्याची तयारी करत आहे. छोट्या व्यावसायिकांसाठी पेटीएम दररोज ईएमआय (EMI) जमा करणारी उत्पादने तयार करत आहे. पेटीएम बिझनेस अॅप (Paytm Business App) मध्ये कंपनी ‘मर्चंट लेन्डिंग प्रोग्राम’ (Merchant Lending Program) सेक्शनमध्ये कंपनी कोलेटरल फ्री लोन (Paytm Collateral Free Loan) प्रदान करते. त्यांच्या दैनंदिन व्यवहाराच्या आधारे प्लॅटफॉर्मच्या अल्गोरिदमद्वारे व्यावसायिकाच्या पत क्षमतेचे मूल्यांकन केले जाते. यानंतर एक प्री-क्वॉलिफाइड कर्जाची रक्कम ऑफर केली जाते.
प्रीपेमेंट शुल्क द्यावे लागत नाही
पेटीएमकडून लोन घेणाऱ्यांना कोणतेही प्रीपेमेंट शुल्क द्यावे लागत नाही. तसेच लोन रिपेमेंटची रक्कम पेटीएमकडून व्यवसायाच्या दैनंदिन सेटलमेंट रकमेसह जमा केली जाते. गेल्या आर्थिक वर्षात पेटीएमने एकूण 550 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. पेटीएम लोनचा फायदा सुमारे 1 लाख व्यापाऱ्यांना झाला आहे.
लोन घेण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल
पेटीएमद्वारे लोन घेण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आहे. यात लोनसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेपासून ते लोन मंजूर होण्याच्या प्रक्रियेपर्यंतचा समावेश आहे. एनबीएफसी आणि बँकांच्या भागीदारीनंतर लोन आवेदकास कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे देण्याची गरजदेखील भासत नाही.
कोणत्याही मोडमध्ये पेमेंट घेण्यास मुभा
अलीकडेच कंपनीने पेटीएम ऑल-इन-वन अँड्रॉइड पीओएस डिव्हाइस लाँच केले आहे. याद्वारे 2 लाखांहून अधिक सूक्ष्म, लघू आणि मध्यम स्तरावरील उद्योजक सर्व पेमेंट मोडमध्ये पैसे घेऊ शकतात. यात पेटीएम वॉलेट, सर्व यूपीआय अॅप्स, डेबिड आणि क्रेडिट कार्ड्स आणि रोख रकमेचादेखील समावेश आहे.
छोट्या आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी व्यवसाय करणे झाले सुलभ
किराणा स्टोअर चालविणाऱ्यांसाठी ‘पेटीएम फॉर बिझनेस’ अॅप खूप उपयुक्त ठरत आहे. किराणा स्टोअर चालवणाऱ्या दुकानदारांना बँक खात्यात सेटलमेंटबाबत पूर्ण माहिती सहजपणे मिळते. तसेच पेमेंटबद्दल त्यांना त्वरित माहिती मिळते. छोट्या शहरांच्या किरकोळ विक्रेत्यांना लक्षात घेऊन या अॅपला 10 प्रादेशिक भाषांमध्ये तयार केले गेले आहे.