नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिजिटल पेमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी पेटीएम (Paytm) ने म्हटले की, पेटीएम पेमेंट्स बँकेच्या (Paytm Payments Bank) प्लॅटफॉर्मवर 15.5 कोटी यूपीआई हँडल्स/आयडी (UPI Handles/ID) आहेत. कंपनीच्या आयपीओसाठी मार्केट रेग्युलेटर सेबीकडे (Sebi) जमा केलेल्या माहितीनुसार पेटीएम यूपीआय हँडल्स पेटीएम पेमेंट्स बँकेद्वारे बनवण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यूपीआय हँडल्स/आयडीचा वापर पैसे पाठवणे आणि प्राप्त करण्यासाठी केला जातो.
पेटीएम पेमेंट्स बँक एनपीसीआय (NPCI) ने सर्टिफाईड पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर आणि
यूपीआय ट्रांजक्शन देणारी बँक (Issuer Bank) आहे.
कंपनीने नुकतेच आयपीओसाठी सेबीकडे जमा डीआरएचपी (DRHP) चा संदर्भ देत एका वक्तव्यात म्हटले की, पेटीएम पेमेंट्स बँकेच्या प्लॅटफॉर्मवर 15.5 कोटी यूपीआय हँडल्स आहे.
डिजिटल पेमेंटमध्ये वेगाने किरकोळ आणि मोठ्या व्यापार्यांच्या दुकानांवर यूपीआयद्वारे पेमेंटमध्ये वाढ होत आहे.
17.1 टक्के भागीदारीसह सर्वात मोठी यूपीआय बेनिफिशियरी बँक
वक्तव्यात रेड सीयर (RedSeer) च्या संदर्भाने म्हटले आहे की, पेटीएम पेमेंट्स बँंक 31 मार्च 2021 ला समाप्त चौथ्या तिमाहीत 17.1 टक्के बाजार भागीदारीसह सर्वात मोठी यूपीआय बेनिफिशियरी बँक होती. वक्तव्यानुसार, 31 मार्च 2021 पर्यंत, पेटीएम पेमेंट्स बँकेकडे 52 अरब रुपयांपेक्षा जास्त जमासह 6.4 कोटी सेव्हिंग अकाऊंट्स होते.
काय आहे यूपीआय
यूनिफाईड पेमेंट इंटरफेस/यूपीआय (Unified Payments Interface) एक रियल टाइम
पेमेंट सिस्टम आहे, जी मोबाइल अॅपच्या माध्यमातून बँक अकाऊंटमध्ये पैसे ताबडतोब ट्रान्सफर करू शकते.
यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही एका बॅक अकाऊंटला अनेक युपीआय अॅपशी लिंक करू शकता.
तसेच, अनेक बँक अकाऊंट एका यूपीआय अॅपद्वारे संचालित करू शकता.
Web Title : paytm payments bank has 155 mn upi handles
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 181 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी