बहुजननामा ऑनलाईन – आता पेटीएम आपल्या ग्राहकांसाठी नवीन कॅशबॅक ऑफर देत आहे. कंपनीने कॅशबॅक प्रोग्राम जाहीर करत डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी हे नवीन ऑफर ग्राहकांना दिले आहे. याअंतर्गत २१०० रुपयांचे कॅशबॅक युजर्सला देण्यात येत आहे. मात्र या ऑफरचा लाभ घेण्यासाठी पेटीएमने काही अट ठेवली आहे.
यासंदर्भात कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यासाठी युजर्सला क्यूआर कोड स्कॅन करून पेटीएमद्वारे पेमेंट करावे लागेल. या ऑफरची सर्वात जास्त खास बाब म्हणजे युजर्सला पेटीएमद्वारे कोणत्याही प्रकारचा क्यूआर कोड स्कॅन करण्यास आणि देय देण्यास सक्षम असतील. इतकेच नाही तर पेटीएम यूपीआय आधारित अॅपच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या क्यूआर कोडला देखील समर्थन देईल.
यामध्ये पेटीएमद्वारे क्यूआर कोडद्वारे देय कधीही, केव्हाही आणि कोठेही करू शकतो याची मर्यादा नाही. हे कॅशबॅक ऑफर कंपनीने दिलेल्या अहवालानुसार शाळेची फी, शॉपिंग मॉल्स आणि सलूनसह इतर कोठेही मिळवू शकतो. क्यूआर कोड आधारित व्यवहारांवरून केलेल्या व्यवहारावर किती कॅशबॅक मिळणार आहे, हे अल्गोरिदम आणि खर्च केलेल्या रकमेवरुन समजणार आहे. या ऑफरसाठी युजर्सकडे वॉलेट केवायसी असणे आवश्यक नाही, हे या ऑफरचे वैशिष्ट्य आहे.