नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या साकेत कोर्टाने मुजफ्फरपूर बालिका हत्येप्रकरणी आरोपींना शिक्षा जाहीर केली आहे. मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता तो तुरुंगात असणार आहे. शिक्षा जाहीर होताच ब्रजेश ठाकूर रडला. अन्य 19 दोषींनाही शिक्षा सुनावली जात आहे. दिल्लीतील साकेत कोर्टाने 4 फेब्रुवारी रोजी शिक्षेवरील वाद पूर्ण केले होते आणि त्यानंतर शिक्षा सुनावण्याची तारीख 11 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयने चौकशी केली आणि तपासाचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आणि दोषींना जास्तीत जास्त शिक्षेची विनंती केली आहे.
टीआयएसएस (Tata institute of social sciences) बालिका घोटाळ्याचा अहवाल समोर आला होता. या अहवालात असे म्हटले आहे की बालिकागृहात 40 हून अधिक मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. अल्पवयीन मुलींनी त्यांना जे काही सांगितले होते ते एकून सगळ्यांना धक्का बसेल. हा अहवाल उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. अहवालानुसार सेवा संकल्प आणि ब्रजेश ठाकूर यांच्या विकास समिती संचलित बालिकागृहात अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यासह इतर भीषण घटना घडल्या आहेत. अहवालातील खुलासे झाल्यानंतर मुझफ्फरपूर महिला पोलिस स्टेशनमध्ये 31 मे 2018 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
बालिकागृहातील मुख्य आरोपी म्हणजे ब्रजेश ठाकूरने ज्या पद्धतीने बालिका गृह बेकायदेशीररित्या चालू ठेवले होते आणि नियमांकडे दुर्लक्ष करून शासकीय निधी प्राप्त करीत होता, त्यावरून लक्षात येते की, त्याची ओळख गल्लीपासून ते ब्यूरोक्रेसीपर्यंत होती. तो त्यांच्या मदतीने सर्व गोष्टी मॅनेज करत होता. स्वयंसेवी संस्थांबरोबरच तो अनेक प्रकारचे वृत्तपत्र देखील प्रसिद्ध करत होता आणि त्यांचे कार्यालय बालिका गृहाच्या आवारात होते. सर्वात मनोरंजक गोष्ट अशी होती की टीसच्या अहवालानंतर त्यांच्या एनजीओला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले गेले आणि असे असूनही त्याला भिकार्यांना घरे देण्यासाठी दरमहा 1 लाख रुपयांचा प्रकल्प देण्यात आला होता. नंतर हा प्रकल्प रद्द करण्यात आला होता.