बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी त्यांनी जोरदार प्रचारही सुरू केला आहे ,रिक्षा तसेच ट्रेन ने प्रवास करत जोरदार प्रचार सुरु आहे.लोकांच्या गाठीभेटी घेणे सुरु झाल्या आहेत मात्र पार्थ पवार यांच्या प्रचार फेरीत फक्त राष्ट्रवादीचेच लोक दिसत आहेत मित्र पक्ष आणि आघाडीचे लोक प्रचारात सहभागी झालेले दिसत नाहीत त्यामुळे त्यांना काँग्रेसची नाराजी महागात पडणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आघाडीबाबत रोहित पवार काय बोलले – भाजपा आणि शिवसेना हे खोटा अपप्रचार करत आहेत लोकांचे मन विचलित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आघाडीबाबत सर्व काही आलबेल असल्याचे त्यांनी सांगितले.