मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Parambir Singh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सचिन वाझे याच्यामार्फत महिना १०० कोटी रुपयांचा हप्ता गोळा केला जात असल्याचा सनसनाटी आरोप करुन माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी खळबळ उडवून दिली होती. आता त्याच परमबीर सिंग (Parambir Singh) व सचिन वाझे (sachin waze) यांच्यासह ६ जणांवर व्हॉटेल व्यावसायिकाकडून ११ लाख ९२ हजार रुपयांचा हप्ता वसुल केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा शुक्रवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
परमबीर सिंग, सचिन वाझे, सुमित सिंग ऊर्फ चिंटु, अल्पेश पटेल, विनय सिंग ऊर्फ बबलु आणि रियाज भाटी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बिमल अग्रवाल (वय ४८, रा. गोरेगाव) यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अग्रवाल याने आपल्या १० पानी जबाबात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
बिमल अग्रवाल (bimal agarwal) हे अंधेरीमधील बोहो रेस्टारंट अँड बार मध्ये भागीदार आहेत. हे हॉटेल चालविण्यासाठी व त्या करीता पोलिसांकडून कोणताही त्रास होणार नाही़ अशी भिती दाखवून त्यापोटी ९ लाख रुपये तसेच सॅमसंग कंपनी फोल्ड २ मॉडेलचे दोन मोबाईलचे २ लाख ९२ हजार रुपये असे ११ लाख ९२ हजार रुपयांची खंडणी स्वरुपात घेतलेले आहेत. जानेवारी, फेब्रुवारी ते मार्च २०२१ दरम्यान हा प्रकार घडला आहे. तसेच हॉटेलवाल्यांकडून आणि बुकीवाल्यांकडून जबरदस्तीने हप्ते वसुल केल्याचे मला समजले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस आयुक्तांच्या नियुक्तीची अगोदरच माहिती असल्याचा गौप्यस्फोट
परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होणार असल्याची माहिती सचिन वाझे याला
अगोदरच होती़ व त्यांची नियुक्ती झाल्यानंतर आपल्याला पुन्हा पोलीस सेवेत घेणार असून
कलेक्शनचे काम माझ्याकडेच येणार आहे, असे सचिन वाझे याने जानेवारी फेब्रुवारी २०२० मध्येच
फिर्यादी यांना सांगितले होते. त्यानुसार ३१ मार्च २०२० रोजी परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस
आयुक्तपदी नियुक्ती झाली व त्यानंतर सचिन वाझे याला पुन्हा पोलीस सेवेत घेण्यात आले. तसेच वसुलीचे कामही त्याच्याकडे सोपविल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title : parambir singh former mumbai police commissioner parambir singhs troubles escalate another ransom case
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Police | सुरेश पिंगळे आत्महत्या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित
Rain in Maharashtra | आगामी 3 ते 4 तासात मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा