नवी दिल्ली :वृत्तसंस्था – Contactless Service | एसबीआय (SBI) मध्ये खाते असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेने आपल्या कस्टमर्ससाठी कॉन्टॅक्टलेस सर्व्हिस (Contactless Service) ची सुरुवात केली आहे. आता यूजर्स घरबसल्या फोनवरच बँकेशी संबंधीत कामे करू शकतील. बँकेने ट्विट करून या नंबरची माहिती दिली आहे.
एसबीआयने जारी केले टोल फ्री नंबर
एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, घरी रहा, सुरक्षित रहा…आम्ही तुमची सेवे करण्यासाठी तिथे आहोत.
एसबीआय तुमच्यासाठी एक संपर्करहित सेवा प्रदान करत आहे जी तुमची तात्काळ बँकेची गरज पूर्ण करण्यासाठी मदत करेल.
आमचा टोल फ्री नंबर 1800 112 211 किंवा 1800 425 3800 वर कॉल करा.
https://twitter.com/
एका फोनवर मिळतील या सर्व सुविधा
एसबीआयने ट्विटसह एक व्हिडिओ अटॅच केला आहे.
यामध्ये सांगितले आहे की, यानंबरवर कॉल करून कस्टमर्स कोण-कोणत्या सेवांचा लाभ घरबसल्या घेऊ शकतात.
व्हिडिओनुसार, अकाऊंट बॅलन्स आणि लास्ट 5 ट्रांजक्शन, ATM बंद किंवा चालू करणे, ATM पिन किंवा ग्रीन पिन जेनेरेट करणे, नवी एटीएमसाठी अप्लाय करण्यासाठी या टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता.
कधीही फोनमध्ये सेव्ह करू नका हे नंबर्स
बँकेने म्हटले आहे की, बँक अकाऊंट नंबर, पासवर्ड, एटीएम कार्डचा नंबर किंवा त्याचे छायाचित्र ठेवल्याने सुद्धा तुमची माहिती लीक होण्याचा धोका आहे.
सोबतच तुमचे अकाऊंट सुद्धा पूर्णपणे रिकामे होऊ शकते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Contactless Service | sbi issue toll free number for many services customers check these number here.
Parambir Singh | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, खंडणीचा आणखी एक गुन्हा
Cyber Fraud मध्ये फसवणूक झालेल्या लोकांना 24 तासात परत मिळतील पैसे, जाणून घ्या पद्धत