नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रपोज करण्याचे अनेक वेगवेगळे प्रकार तुम्ही पाहिले असतील. कोणी गुडघ्यवार बसून प्रपोज करतं तर कोणी समुद्रकिनारी. एक भन्नाट प्रपोज समोर आला आहे. एका अभिनेत्रीने एकाला प्रपोज करताना म्हटले आहे की, माझ्या मुलांचा बाप होशील का ? सदर अभिनेत्री ही पाकिस्तानमधील असून तिने न्यूझिलंडचा क्रिकेटपटू जिमी निशामला प्रपोज केलं आहे. सेहर शेनवारी असं या अभिनेत्रीचं नाव आहे. ट्विटरवर सेहरने ट्विट केलं आहे.
https://twitter.com/SeharShinwari/status/1166613046921441282
सध्या सेहरच्या या ट्विटची आणि प्रपोजची सोशलवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. सेहरची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी सेहरच्या या ट्विटवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. काही युजर्नसे कमेंट करताना जिमीला सजेशनही दिले आहेत.
I really feel like the emojis were unnecessary https://t.co/tH3g0jCWe4
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) August 28, 2019
इतकेच नाही तर सेहर शेनवारीच्या या ट्विटला जिमी निशामने उत्तरही दिले आहे. जिमीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मला खरोखर असे वाटते की इमोजी अनावश्यक होते.” जिमीच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी तसेच त्याच्या चाहत्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. अनेकांनी त्याला सजेशन दिले आहे. काहींनी जिमीच्या ट्विटवर मजेदार कमेंटही केल्या आहेत.