नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील अनेक ठिकाणांहून जप्त करण्यात आलेल्या 2000 च्या नकली नोटांनी सुरक्षा एजन्सीची झोप उडवली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, या नकली नोटा पाकिस्तानकडून पाठवण्यात आल्या आहेत. या नोटा एकदम खऱ्या वाटत आहेत. पाकिस्तानने हुबेहूब 2000 च्या नोटेची कॉपी केली आहे. जी सरकारी मदतीशिवाय शक्य नाही. सत्य हे आहे की, पाकिस्तानी सेक्युरिटी प्रेसमध्ये छापल्यानंतर भारतीय बाजारात फिरत असलेल्या या बनावट नोटांमध्ये आणि भारतीय नोटांमध्ये फरक करण्यास सुरक्षा एजन्सीज आणि दिल्ली पोलीस अक्षम आहेत.
जप्त केलेल्या बनावट नोटांची तपासणी केल्यानंतर हे सिद्ध झालं आहे की, हे एक षडयंत्र आहे. ज्याचा वापर करत पाकिस्तानी सरकारी यंत्रणा भारतीय अर्थव्यवस्थेला उध्वस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उच्च प्रतीच्या बनावट भारतीय नोटा छापत आहे.
विशेष प्रकारच्या शाईचा वापर
तपासात समोर आलं आहे की, कराचीच्या मलीर हाल्ट भागातील पाकिस्तानी सेक्युरिटी प्रेस मध्ये छापल्या जाणाऱ्या या बनावट नोटांमध्ये पहिल्यांदा ऑप्टिकल व्हेरिययबल इंक चा वापर करण्यात आला आहे. ही विशेष प्रकारची शाई 2000 च्या नोटांच्या धाग्यावर वापरली जाते. या शाईची खासियत अशी की, ही नोट हिरव्या रंगाची दिसते. ही नोट वर खाली केल्यानंतर या शाईचा रंग बदलून आपोआपच निळा होतो.
नोटेत वापरलेल्या उच्च भारतीय तंत्राचाही बनावट नोटेत वापर
दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल आणि भारतीय गुप्तचर संघटनांच्या संयुक्त तपासात खुलासा झाला आहे की, 2000 आणि 500 च्या नव्या नोटांमध्ये आणखी एक प्रमुख सेक्युरिटी फिचर देखील पहिल्यांदाच आयएसआयच्या आपरेटीव्हने हुबेबूक कॉपी केलं आहे. 2000 च्या नव्या भारतीय नोटांमध्ये डाव्या आणि उजव्या बाजूच्या किनारीवर ब्लीड लाईन्स रेखाटल्या आहेत. या 7 लाईन्स विशेष करून नेत्रहीन लोकांना नोटेची ओळख सहज पटावी म्हणून उपयोगी ठरतात. ही देखील उच्च भारतीय तंत्राचीच कमाल आहे की, नोट गोल केल्यानंतर या लाईन्स आपापसात विशेष पद्धतीने एकमेकांशी जुळणे हे जवळपास अशक्य समजलं जात होतं.
सीरीजचा नंबरही बनावट
पाकिस्तानी गुप्तचर संघानांच्या अधिकाऱ्यांनी कराचीच्या सरकारी प्रेसमध्ये छापल्या जाणाऱ्या बनावट भारतीय नोटांच्या खालच्या भागात उजव्या बाजूला छापण्यात आलेला सीरीज नंबरही कॉपी केला आहे. नुकत्याच जप्त केलेल्या 2000 रुपयांच्या बनावट नोटांमध्ये ही गोष्ट समोर आली आहे.
असा झाला या फसवणुकीचा खुलासा
ईटीमध्ये छापलेल्या एका वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुमार सिंह कुशवाहा यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस आयुक्त अतर सिंह यांच्या टीमने 24 ऑगस्ट रोजी दिल्लीतील नेहरू प्लेस मध्ये डी कंपनीचा एजंट असलम अंसारी याला पकडलं होतं. असलम अंसारीकडून 2000 च्या नोटा असलेले सुमारे साडेपाच लाख बनावट भारतीय चलन जप्त केले आहे. असलम मूळचा नेपाळचा आहे.
- आरोग्यविषयक वृत्त –
- घाम जास्त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय
- पिस्ता खाल्ल्याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्या असेच ६ फायदे
- सावधान ! चुकीच्या मालिशमुळे जाऊ शकतो जीव, लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्टी
- डोळ्यांची ‘ही’ समस्या झाल्यास करा ‘हे’ ८ घरगुती उपाय
- पुरुषांमधील ‘ब्रेस्ट कँसर’चे ६ मोठे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष
- ‘बेकिंग सोड्या’ने वाढवा सौंदर्य ! जाणून घ्या याचे १० अमेझिंग उपयोग
- ‘जापनीज वॉटर थेरेपी’ने वेगाने कमी होते वजन, फक्त असे प्यावे पाणी