नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर सध्या भारतातील दोन शालेय मुलांचा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे. यामध्ये हे दोन मुलं जिमनॅस्टीक मूव्स करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी सोशलवर आलेला हा व्हिडीओ पाहता पाहता व्हायरल झाला. पाच वेळा ऑलिंपिक गोल्ड मेडसिस्ट रोमानियाची जिमनॅस्ट नाडिया कोमेंसी पर्यंत हा व्हिडीओ पोहोचला.
एकेकाळची जिमनॅस्ट नाडिया कोमेंसीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करत मुलांची स्तुती केली आहे. व्हिडीओत शालेय मुलांच्या या जोडीने शानदार समरसॉल्ट आणि कार्टव्हीलचं स्किल दाखवलं. नाडिया तिच्या परफेक्शनसाठी ओळखली जाते. तिने अनईवन पॅरलल बार्समध्ये 10.0 चा स्कोर केला होता.
This is awesome pic.twitter.com/G3MxCo0TzG
— Nadia Comaneci (@nadiacomaneci10) August 29, 2019
या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या पराक्रमावर क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यांचं आधीच लक्ष गेलं आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विट करत म्हटलं होतं की, ही मुलं प्रतिभावान आहेत. जर कोणी दोघांना त्यांच्याकडे आणलं तर ते या मुलांना जिमनॅस्टीकचं अॅकेडमीमध्ये ट्रेनिंग देऊ शकतील.
image.png
अद्याप हे मात्र समोर आलेलं नाही की, हे शालेय विद्यार्थी भारतातील कोणत्या भागातील आहेत. या व्हिडीओवर आलेल्या कमेंट्सवरून हा व्हिडीओ नागालँडचा आहे. या शालेय विद्यार्थ्यांनी ऑलिंपिक चॅम्पियनच नाही तर जगभरातील लोकांना आपला फॅन बनवलं आहे.
- आरोग्यविषयक वृत्त –
- घाम जास्त येत असेल, तर आवश्य करून बघा ‘हे’ खास १३ उपाय
- पिस्ता खाल्ल्याने स्किन कँसरपासून होतो बचाव, जाणून घ्या असेच ६ फायदे
- सावधान ! चुकीच्या मालिशमुळे जाऊ शकतो जीव, लक्षात ठेवा ‘या’ ५ गोष्टी
- डोळ्यांची ‘ही’ समस्या झाल्यास करा ‘हे’ ८ घरगुती उपाय
- पुरुषांमधील ‘ब्रेस्ट कँसर’चे ६ मोठे संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष
- ‘बेकिंग सोड्या’ने वाढवा सौंदर्य ! जाणून घ्या याचे १० अमेझिंग उपयोग
- ‘जापनीज वॉटर थेरेपी’ने वेगाने कमी होते वजन, फक्त असे प्यावे पाणी