नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारनं कलम ३७० हटविण्याा प्रस्ताव आज (सोमवारी) राष्ट्रपतींकडे पाठविला. त्यापुर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कलम ३७० हटविण्याबाबत राज्यसभेत शिफारस केली. काश्मीरचा विशेष दर्जा संपणार आणि कलम ३७० रद्द होणार असल्याने काश्मीरमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. तेथील नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त करत लाल रंगांचा ट्रेंड आणला आहे.
संतप्त नागरिकांनी प्रत्येकाला लाल रंगोचे प्रोफाईल पिक्चर ठेवण्याचे आवाहन केले आहे. लाल रंग म्हणजे तो आपल्या रक्ताचा, इतिहासाचा रंग आहे. लाल रंग हा सर्वांचाच आहे असे संदेश देण्यात येत आहेत. दरम्यान, पाकिस्तानमधील नागरिकांनी देखील ट्रेंडला पाठिंबा दिला आहे. सध्या ट्विटरवर आणि हे दोन ट्रेंड सुरू करण्यात आले आहेत. काश्मीर समर्थक आणि पाकिस्तानी नागरिक त्यांच्या ट्विटर प्रोफाईलवर लाल रंग ठेवत आहेत.
https://twitter.com/RuqatMir/status/1158116137911148547