नवी दिल्ली बहुजननामा : आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी पोस्ट ऑफिस हा एक उत्तम पर्याय आहे. आपल्या गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिस नेहमीच नवनवीन आणि फायदेशीर योजना आणत असतात. ज्यातून दुप्पट फायदा होत असतो. असाच ‘एफडी’ हा देखील गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय आहे. कारण एफडी मध्ये गुंतवणूक केल्यास १० ते १२ वर्षात दुप्पट फायदा होत असतो. पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूकदारास कमी वेळेत जास्त फायदा होत असतो. इथे १० वर्षात पैसे दुप्पट होतात. त्यासाठी टाइम डिपॉजिट हा देखील उत्तम मार्ग आहे, ज्यामध्ये आपल्याला पाच वर्षांनंतर पुन्हा त्या योजनेत पैसे गुंतवता येतात. त्यामुळे आपल्याला १० वर्षानंतर अधिकतम फायदा होतो.
पोस्ट ऑफिस मध्ये आपण एक वर्षे, दोन , तीन आणि पाच वर्षे अश्या प्रकारे गुंतवणुक करू शकतो. वर्षाच्या मुदतीवर ६.९ तर दोन वर्षाच्या मुदत ठेवीवर ७.२ टक्के व्याज मिळत. तसेच तीन वर्षाच्या ठेवीवर ७. ४ तर पाच वर्षाच्या ठेवीवर ७. ७ इतकं व्याज मिळत. महत्वाचे म्हणजे पाच वर्षाच्या ठेवीवर प्राप्तिकर कायद्यानुसार सवलत देखील मिळते आणि कर देखील लागू होत नाही. आपण पोस्टात २०० रुपयांपासून एफडी खाते सुरु करू शकतो, त्यात ५०० रुपये जमा असणे गरजेचे आहे. तसेच त्यांच्या सेविंग योजने अंतर्गत १० हजारांपर्यंतच व्याज हे कर मुक्त असतं.
एफडी खाते सुरु करण्यासाठी आपल्या फॉर्म भरावा लागतो, तो इतर साईट वरूनही डाउनलोड करून घेऊ शकतो. त्यासाठी केवायसी पूर्ण करावं लागतं. आयडीफ्रुफ साठी आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, विजेचं बिल , बँकेचं पासबुक , फोटोस इत्यादी गोष्टी उपयुक असतात.