बहुजननामा ऑनलाईन – उबेर ड्रायव्हरने एका महिलेसोबत रात्री गैरवर्तन केले आणि तिला कॅबमधून उतरण्यास सांगितलं. तसेच तू कॅबमधून उतरली नाही तर तुझे कपडे फाडून टाकेल अशी धमकी या ड्रॉयव्हरने या महिलेला दिली. असा आरोप कॅब ड्रायव्हर विरोधात कॅबमधून प्रवास करत असलेल्या एका महिलेने केला आहे. या महिलेने ट्विटरद्वारे ही तक्रार केली आहे.
या महिलेने म्हंटल आहे की ऑनलाईन कॅब ऑर्डरची ही सिस्टम खराब आहे. कारण सेप्टी बटन दाबल्यानंतर अडचणीत असलेल्या व्यक्तीच्या ऐवजी ड्रायव्हर ला कॉल लागतो. त्यामुळे जी व्यक्ती अडचणीत आहे. तिची सुटका तर होऊ शकत नाही आणि ती व्यक्ती तक्रारही करू शकत नाही. असे त्या महिलेने म्हंटले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की त्या ड्रायव्हरने या महिलेला सांगितले की तुम्ही ७ वाजायच्या आतमध्ये घरात गेलं पाहिजे. तसेच घरी चालत गेलं पाहिजे आणि मैत्रिणीसोबत दारू नाही पिली पाहिजे. त्या महिलेनं त्या ड्राइव्हर ला सांगितलं की मी दारू वगैरे काही पिले नाही आणि आम्ही काय केलं पाहिजे काय नाही. हे तुम्ही मला सांगू नका. तुम्ही फक्त कामाशी काम ठेवा. यानंतर त्या ड्रायव्हरने त्या महिलेसोबत गैरवर्तन केले. त्यामुळे ही महिला एकदम घाबरून गेली होती. असे त्या महिलेने सांगितले.
तसेच या महिलेने नंतर सेफ्टी बटन दाबले तर उबरने ड्रायव्हरला फोन केला आणि त्या महिलेला गाडीतून उतरून द्यायला सांगितले. व त्या महिलेला अर्ध्या रात्री गाडीतून सोडून दिले. याबद्दल उबरने सांगितले की याबाबत आम्ही तपास करत आहोत.