बहुजननामा ऑनलाईन – तरुण मुलींना अनैतिक मार्गाला लावत देहविक्री करणाऱ्या महिलेसह बंगल्याच्या मालकाला पोलसांनी रविवारी ताब्यात घेतले आहे. ही घटना श्रीरामपूर शहरातील गोंधवणी येथे घडली. तसेच यावेळी येथे आलेले तीन ग्राहकही पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. पिटाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
तसेच ही कारवाई होण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच हा हे रॅकेट अजून मोठे असण्याची शक्यता आहे. या आरोपींकडून अजून माहिती मिळू शकते. असे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी सांगितले आहे.
दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये लक्ष्मी उर्फ प्रिती राजेश माखिजा (३२), अशोक दामोधर देशमुख तसेच नानासाहेब जगन्नाथ शेळके (२९) प्रकाश विलास दौंड (36), श्रीकांत कैलास अनारसे (२४), सतीश दिलीप मेटे (२२), अनिल जगन्नाथ शेळके (२५) यांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी महिला लक्ष्मी माखेजा ही गोंधवणी येथे देशमुख यांच्या बंगल्यात भाड्याने राहत होती. आरोपी नानासाहेब शेळके व प्रकाश दौंड यांच्यासह आर्थिक फायद्यासाठी पीडित मुलीकडून ते देहविक्रीचा व्यवसाय करत होते. पीडित ही औरंगाबाद येथील २४ वर्षीय तरुणी आहे.