यवतमाळ : बहुजननामा ऑनलाईन – समाजरत्न, धम्मधर पां. कृ. भगत यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आर्णी येथील रेणुका मंगल कार्यालयात बुद्घ-भीम गीत-भजन स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये दिग्रस येथील प्रसेनजित भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वासुदेव भगत होते. उद्घाटक श्रीकृष्ण जावळकर होते. प्रमुख पाहुणे दत्ता मार्केड, भीमदास नाईक, आनंद भगत, भूषण भगत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमेध भगत यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे दत्ता मार्केड, भीमदास नाईक, श्रीकृष्ण जावळकर यांनी मनोगत व्यक्त केले. वासुदेव भगत यांनी विचार व्यक्त केले. यावेळी बुद्घ-भीम गत-भजन स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेत जिल्ह्यातील १५ भजनी मंडळांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे परीक्षक दत्ता मार्केड, नरेंद्र दैवालये होते.
या स्पर्धेत दिग्रस येथील प्रसेनजित भजनी मंडळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना ८ हजार रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात आले. शिलोरी येथील पंचशील भजनी मंडळ यांचा दुसरा क्रमांक आला. त्यांना ५ हजार रु. रोख प्रमाणपत्र देण्यात आले. मनोरा येथील प्रसेनजित भजनी मंडळ यांचा तृतीय क्रमांक आला असून, त्यांना ३ हजार रु. रोख व प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाला भीमराव मनवर, संजय खोब्रागडे, रवींद्र मेश्राम, मिलिंद तेलंग, नथ्थू पेटारे, अमर माहुरे, कांता मनवर, शीला खोब्रागडे, रेखा भगत, किरण भगत, अश्वघोष भगत, सांची भगत, अनुजा भगत, संविधान भगत यांच्यासह समाजबांधव, नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन रवी देवस्थळे यांनी केले तर आभार भूषण जाधव यांनी मानले.