मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. विविध राजकीय पक्षांच्या जाहीर प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. तर नेत्यांकडून एकमेकांवर टोकाचे आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. जास्तीतजास्त सोशल मीडियाची मदत घेताना राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते दिसत आहेत. ओवेसी यांचे काही फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. यामध्ये ते महिलांसोबत फोटो काढताना दिसून येत आहेत. मात्र ओवेसी फोटो काढताना महिलांपासून सुरक्षीत अंतर ठेवून उभे असल्याचे दिसतात. तसेच फोटो घेताना ओवेसी अंग चोरताना दिसत आहेत.
अनेकदा राजकीय नेते महिलांसोबत फोटो घेताना महिलांशी अंगलट करताना दिसले आहेत. तर अनेक नेत्यांनी महिलांचा हात हातात घेऊन काढलेले सोशल मीडियावर अनेक नेते दिसले आहेत. मात्र ओवेसी याला अपवाद
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विविध पक्षाचे नेते आपल्या उमेदवारांसाठी सभा घेत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर नेत्यांसंदर्भात व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओला महत्त्व प्राप्त होत आहे.