पटना : वृत्तसंस्था – चांद्रयान २ च्या यशस्वी प्रक्षेपानंतर या मोहिमेचे श्रेय घेण्यासाठी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये चढाओढ लागली आहे. काँग्रेसने इस्रोचा पाया पं. जवाहरलाल नेहरूंनी केल्याचं ट्वीट चांद्रयान २ लॉंच झाल्यानंतर केलं. त्यावर गिरिराज सिंह यांनी कॉंग्रेसची फिरकी घेतली. त्यांनी केलेले ट्वीट नंतर त्यांनी डीलीट केले.
गिरीराज सिंह यांनी ट्विट केले की, देशाला आठवण करून देण्याची हीच खरी वेळ आहे … चंद्राचा शोध देखील काँग्रेसनेच लावला होता. काही वेळानंतर गिरिराजसिंह यांनी हे ट्विट डिलीट करून टाकले.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दूरदर्शी पाउलाची आठवण करायची हीच खरी ओळख आहे. त्यांनी १९६२ मध्ये INCOSPAR ची स्थापना करून स्पेस रिसर्च ची सुरवात केली होती. त्यानंतर इस्रोची स्थापना झाली असं काँग्रेसने ट्विटमध्ये नेहरू आणि वैज्ञानिकांचा फोटो जोडून लिहिले होते.
चांद्रयान २ प्रकल्पाला २००८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीच मंजुरी दिली होती. असं काँग्रेसने मनमोहनसिंग यांचा ट्विटमध्ये उल्लेख करत लिहिले. त्यावर गिरिराजसिंह म्हणाले की, देशाला आठवण करून देण्याची गरज आहे की, चंद्राचा शोध देखील काँग्रेसनेच लावला होता.
This is a good time to remember the visionary move of India's first PM Pandit Jawaharlal Nehru to fund space research through INCOSPAR in1962 which later became ISRO. And also Dr. Manmohan Singh for sanctioning the #Chandrayan2 project in 2008. pic.twitter.com/2Tje349pa0
— Congress (@INCIndia) July 22, 2019