बहुजननामा ऑनलाइन टीम –मुंबईत आजपासून दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. मात्र या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे गडद सावट आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येकाची स्वॅब टेस्ट घेण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 415 जणांची चाचणी करण्यात आली असून यामध्ये 21 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना तातडीने क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये सचिव मंत्री, विधिमंडळ सदस्य, आमदार असे तीन जण असल्याची माहिती आहे. उर्वरित सर्वाधिक पॉझिटिव्ह टेस्ट आळल्याच्या संख्येमध्ये मंत्रालय अधिकारी कर्मचारी विधिमंडळ कर्मचारी तसंच काही प्रसारमाध्यमांचे लोकदेखील असल्याची माहिती मिळत आहे. ज्या लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे अशा लोकांना विधिमंडळाच्या अधिवेशनात सहभागी होता येणार नाही.
कोविड चाचणीचे अपडेट
– स्वॅब टेस्ट – एकूण चाचण्या -415
– पॉझिटिव्ह – 21
– E desk (VIP) – 3 (यामध्ये सचिव आणि आमदार याची चाचणी केली )
– A Desk – 7
– B Desk – 3
– C Desk – 2
– D Desk – 6
– E – मंत्री सचिव
– डी – मंत्रालय अधिकारी कर्मचारी
– सी – विधीमंडळ कर्मचारी
– डी – इतर ( यात काही आमदार तसेच अधिकारी यांची टेस्ट करण्यात आली)
– A – Press
– पहिल्या दिवशी 1700 चाचण्या त्यामध्ये पॉझिटिव्ह 37 जण
– दोन दिवसा आमदार कक्षात 14 जण तर अति महत्त्वाच्या कक्षात 7 जण कोरोना पॉझिटिव्ह
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही नेत्यांना तर कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचं घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील कोरोनामुळे वेळेआधी स्थगित करावं लागलं होतं.