बहुजननामा ऑनलाईन टीम : अलवर जिल्ह्यातील थानगाजी सामूहिक बलात्कारानंतर अलवरमध्ये पुन्हा एकदा संतापजनक घटना समोर आली आहे. अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड परिसरातील राहणाऱ्या विवाहितेवर तिच्याच दीर, नातेवाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. एवढंच नव्हे तर या घटनेचा अश्लील व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे . हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीडित मुलीने अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पीडितेने नोंदविलेल्या तक्रारीनुसार भरतपूर जिल्ह्यात ९ वर्षापूर्वी तिचे लग्न झाले होते. सासरच्या मंडळींनी १ वर्षापूर्वी आपल्या दिराकडून तिचा मोबाईल नंबर एका नातेवाईकाला दिला होता. त्यानंतर त्याने तिला वारंवार फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली, तिने याचा विरोध देखील केला. पण हळू हळू त्याने तिला आपल्या बोलण्यात पकडले आणि तो तिच्याशी बोलू लागला. एके दिवशी ती गोपाळगड येथे आली असता नातेवाईकाने तिला पाहिले. त्यानंतर,तिला विचारल्यानंतर तिने माहेरी जात असल्याचे सांगितले. त्याने तिला तिकडेच जात असल्याचे सांगून तुला सोडतो असे सांगितले, त्याने तिला रस्त्याने जाता- जाता एका हॉटेलमध्ये नेले आणि तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला आणि घडलेल्या प्रकाराबद्दल कोठेही न सांगण्याची धमकी दिली आणि पीडितेला माहेरी सोडले.
यानंतर घाबरल्या पीडितेने या प्रकबद्दल कोठेही वाच्यता केली नाही, यानंतर त्या व्यक्तीने तिचा नंबर अजून एका नातेवाईकाला आरिफला दिला. त्यानंतर आरिफनेही तिला घडलेल्या प्रकारावरून धमकविण्यास सुरुवात केली, सांगितलेल्या ठिकाणी आली नाही तर मी तुला बदनाम करेल, अशी धमकी दिली. यामुळे पीडितेला भीती वाटली व ती त्याच्याबरोबर निघून गेली. आरोपीने त्याला अलवरच्या जेलच्या चौकात नेले आणि त्याच्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपी जेसीबीच्या मशीनवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्यानंतर, बकरीईदच्या एक दिवस आधी आरिफने तिला धमकावून परत बोलावले.
धमकीच्या भीतीने, ती त्याच्याबरोबर गेली आणि शहरात नेल्यानंतर त्याच ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. तेथे पाच लोक आधीपासून बसले होते. तिच्या थंड पेयात त्यांनी ड्रग्स मिसळले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला व तिचा नग्न अवस्थेत अश्लील व्हिडिओ बनविला. याचा विरोध केला असताना तिला मारहाण देखील करण्यात आली. आणि पुन्हा धमकावण्यात आले.यानंतर आरोपींची घटनेचा विडिओ सोशल मीडियावर वायरल करून तिला अपमानित केले, त्यानंतर तिने आरोपींविरुद्ध लक्ष्मणगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. लक्ष्मणगड पोलिस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर सुंदर शेखर यांनी सांगितले की विवाहितेने बलात्काराचा गुन्हा नवरा, दीर , नातेवाईक आणि त्याच्या मित्रांवर नोंदविला आहे. अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या रिपोर्टही देण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक नेमण्यात आले असून लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल.
Visit : bahujannama.com