बहुजननामा ऑनलाइन : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार्यांसाठी मोठी खुशखबर आहे. कारण येत्या काही दिवसांत तुम्ही फक्त ५ रुपयांतदेखील गुंतवणूक करू शकता. ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)’ या नवीन योजने अंतर्गत तुम्ही अवघ्या ५ रुपयांत गुंतवणूक करू शकता. अहवालानुसार एसआयपी किंवा सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट योजनेत तुम्ही हवी तितकी रक्कम जमा करू शकता. साधारणपणे इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये अशी योजना उपलब्ध असते. मात्र या योजनेमुळे तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. ज्यामुळे शेअर बाजाराच्या चढ -उतारातही तुमची गुंतवणूक सुरु राहील.
एएमएफआयचे मुख्य कार्यकारी एनएस वेंकटेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, तंत्रज्ञानाच्या मदतीने पाच रुपयांची एसआयपी मिळू शकेल. आधारच्या मदतीने छोट्या शहरांतील लोकांना म्युच्युअल फंडाशी जोडणे सोपे झाले आहे आणि म्युच्युअल फंडावरील लोकांचा विश्वास अजूनही आहे. बाजारातील चढ-उतारांमुळे लोक गुंतवणूक कमी करत आहेत. पुढील ८ ते १० महिन्यांत ही सुविधा सुरू होईल. म्युच्युअल फंडामधील १५ टक्के शेअर्स हे लहान शहरांचे असून येत्या काही वर्षांत ही वाढ ३० टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य आहे.
दरम्यान या गुंतवणूकीत वयाची कोणतीही अट नाही. म्युच्युअल फंडामध्ये कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. जर थोड्या काळासाठी व्यक्ती धोका पत्करण्यासाठी तयार असेल, तर एसआयपीद्वारे गुंतवणूक केली गेली तर ते इतर गुंतवणूकीच्या पद्धतींपेक्षा एक चांगला पर्याय असेल.