बहुजननामा ऑनलाईन टीम – आरोग्य विमा (हेल्थ इन्शोरन्स)ला प्रोत्साहन देण्यासाठी विमा नियामक (इन्शोरन्स रेग्युलेटर) आयआरडीएआयने आता वार्षिक प्रीमियमऐवजी मासिक, तिमाही, सहामाही प्रीमियमला मान्यता दिली आहे. याशिवाय आता विमा कंपन्या आयआरडीएआयच्या मान्यतेची वाट न पाहता त्यांच्या उत्पादनांमध्ये छोटे बदल करण्यास सक्षम असतील. यामध्ये अतिरिक्त रायडरकडून वृद्धापर्यंत विमा संरक्षण देणे समाविष्ट आहे.
आरोग्य विमा या कारणांमुळे सुलभ झाला
आरोग्य विमाकडून मासिक, तिमाही, सहामाही प्रीमियमला मान्यता देण्यात आली आहे.
आता पर्यंत केवळ वार्षिक प्रीमियमला मंजूरी होती.
इन्शोरन्स रेग्युलेटर आयआरडीएआयने मंजुरी दिली आहे.
कंपन्यांना उत्पादनांमध्ये छोटे बदल करण्यास मान्यताही मिळाली.
प्रमाणपत्राद्वारे उत्पादनांमध्ये लहान बदलांना मान्यता देण्यात आले.
आयआरडीएआयच्या मंजुरीशिवाय उत्पादनाच्या प्रीमियममध्ये १५% पर्यंत बदल करण्याची मान्यता.
कंपन्या वयाच्या ६५ व्या वर्षीही आरोग्य विमा प्रदान करू शकतील.
पॉलिसी धारकांना होतील हे फायदे
पॉलिसी धारकांवर एकदमच संपूर्ण प्रीमियमचा भार पडणार नाही.
आरोग्य विम्याला चालना मिळेल.
विम्याचे वितरण वाढेल तसेच यामध्ये अधिक पारदर्शकता येईल.
लोक जास्त रकमेचे विमा संरक्षण घेतील.
कंपनी ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादन बनवेल.
ज्येष्ठ नागरिकांना विमा संरक्षणाचा अधिक लाभ मिळेल.
Visit : bahujannama.com