नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे १७०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून चीनमधील वुहान येथे या विषाणूची सुरुवात झाली. हा विषाणू आता २५ पेक्षा अधिक देशात पसरला असून याची भविष्यवाणी ४० वर्षांपूर्वीच केली गेली असल्याची माहिती समोर येत आहे.
‘द आईज ऑफ डार्कनेस’ हे १९८१ मध्ये लिहिले गेलेले डियान कुंटज यांचे पुस्तक आहे. या पुस्तकात वुहान – ४०० नावाच्या एका व्हायरसचा उल्लेख केला गेला आहे. यात जैवशास्त्र हत्यार बनवण्यासाचा प्रयत्न करत असताना एक विषाणू जन्म घेतो.
ट्विटरवर DarrenPlymouth नावाच्या एका ट्विटर हँडलवर पुस्तकाच्या कव्हर फोटोला पोस्ट करत पुस्तकातील वुहान-४०० नावाच्या व्हायरसचा उल्लेख असलेल्या उताऱ्याचा फोटोही पोस्ट केला आहे. त्यानंतर त्याची सगळीकडे चर्चा होत आहे. ट्विटमध्ये कॅप्शनमध्ये आपण एका वेगळ्या जगात राहत आहोत. गोष्टी अनेकदा आश्चर्य करून टाकणाऱ्या असतात, असे लिहिले आहे.
४० वर्षांपूर्वीची ही गोष्ट खरी होत असताना बघून लोकांनी सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केले आहे. कॉंग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनीही या पुस्तकाचा एक उतारा शेअर केला करत कोरोना व्हायरस बायो – शस्त्र वुहान-४०० चीनने विकसित केले आहे का ? हे पुस्तक १९८१ मध्ये प्रकाशित झाले होते. आपण त्याचे उतारे वाचा.
जगातील अनेक विश्लेषकांना भीती आहे की, चीन कोरोना विषाणूबद्दल काही सत्य लपवित आहेत. विश्लेषकांचे म्हणण्यानुसार कोरोना विषाणूचा चिनी प्रयोगशाळेतून उद्भवला होता आणि तो जैव शस्त्रे बनविण्याचा प्रयत्न करीत होता. चीनच्या सर्व शास्त्रज्ञांनी हा दावा फेटाळत त्याला नैसर्गिक कारण दिले आहे.