नवी दिल्ली, वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरात चालू असून भाजपकडून सतत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला जात आहे. तर भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा उल्लेख दहशतवादी असा केला असून आता त्याचाच पुनरुच्चार केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. जावडेकर यांनी केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे आहेत, असा आरोप केला आहे. त्यानंतर ‘आप’कडून जावडेकरांच्या विधानावर तीव्र विरोध केला जात असून यासंबंधी निडवणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी पक्षाने केली आहे.
जावडेकर हे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच केजरीवाल भाबडा चेहरा करून ‘मी दहशतवादी आहे का ?’ असा प्रश्न विचारात आहेत. त्याचे उत्तर होय असे असून याचे बरेच पुरावे उपलब्ध आहेत. मी अराजकवादी आहे, असे विधान केजरीवाल यांनी केले असून अराजकवादी आणि दहशतवादी यामध्ये जास्त फरक नसतो, असे म्हणत जावडेकर यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.
#WATCH Union Minister Prakash Javadekar in Delhi: Kejriwal is making an innocent face & asking if he is a terrorist, you are a terrorist, there is plenty of proof for it. You yourself had said you are an anarchist, there is not much difference between an anarchist & a terrorist. pic.twitter.com/vRjkvFKGEO
— ANI (@ANI) February 3, 2020
जावडेकर यांच्या अगोदर भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनीही अरविंद केजरीवालांची तुलना दहशतवाद्यांसोबत केली होती. ते म्हणाले होते की, केजरीवाल यांच्यासारखे नटवरलाल, दहशतवादी देशात लपलेले आहेत. तेव्हा काश्मीरमधील दहशतवाद्यांशी लढावे की केजरीवाल यांच्यासारखा दहशतवाद्यांशी लढावे, असा प्रश्न आम्हाला पडतो.