बहुजननामा ऑनलाइन : नोकिया कंपनीने नोकिया १०५ (२०१९) हा नवीन फिचर फोन भारतात लाँच केला आहे. या फोनच वैशिष्ट म्हणजे याची दमदार बॅटरी. या फोन मध्ये २५ दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या फोनची किंमत केवळ 1,199 रुपये असणार आहे. यामध्ये 1.77 इंचाचा कलर स्क्रीन डिस्प्ले आहे.
नोकियाच्या या फोनमध्ये आइसलँड कीमॅट डायल पॅड, क्लासिक स्नेक गेम आणि कलर्ड पॉलीकार्बोनेट बॉडी देखील मिळणार आहे. स्नेक गेमशिवाय यामध्ये टेटरिस, स्काय गिफ्ट, एअरस्ट्राइक, निट्रो रेसिंग, निंजा अप आणि डेंजर डॅश ह्या गेम्सचा समावेश असणार आहे. आहेत. तसेच यात 2,000 मोबाईल नंबर आणि 500 SMS सेव्ह करता येतील. याशिवाय Nokia 105 (2019)मध्ये 4GB इंटरनल स्टोरेज देखील उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहक या फोनला चांगलीच पसंती दर्शवतील , असे म्हणता येईल.
20 ऑगस्टपासून हा फोन ब्ल्यू, पिंक आणि ब्लॅक या तीन रंगांमध्ये सर्वत्र उपलब्ध आहे. नोकियाच्या ऑनलाइन स्टोअर्स आणि देशभरातील अव्वल रिटेल आउटलेट्समध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये 4MB रॅम आणि 4GB इंटरनल स्टोरेज आहे. यातील 800 mAh क्षमतेची बॅटरी 25 दिवसांचा स्टँडबाय टाइम आणि 14.4 तासांचा टॉकटाइम बॅकअप देईल असा दावा कंपनीने केला आहे. फोनमध्ये 3.5 mm चा ऑडियो जॅक असून हा फीचर फोन Series 30+ OS वर कार्यरत असेल. या फोनमध्ये FM रेडिओ आणि LED टॉर्चलाइट देखील आहे. 74.04 ग्रॅम वजनाच्या या फोनमध्ये गेम्सचा समावेश आहे. परंतु यामध्ये कॅमेराचा समावेश करण्यात आलेला नाही.