नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणातील दोषी फाशीसाठी सतत उशीर करत असून आता दोषी पावन गुप्ता यानेही सर्वोच्च न्यायालयात याचिका क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. या याचिकेत पावन गुप्ताने फाशीच्या शिक्षेच्या बदल्यात जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी केली आहे.
निर्भया दोषींना फाशीची तारीख जवळ येत असून दिल्लीच्या कोर्टाने नवीन डेथ वॉरन्ट जारी करत ३ मार्चला सकाळी फाशी देण्याची घोषणा केली होती. याच्या पहिलेही डेथ वॉरन्ट जारी केले असताना फाशी टळत आहे.
पवन गुप्ताने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करत फाशीची शिक्षा जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दोषी पवन गुप्ता याने अजूनपर्यंत सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली नव्हती आणि राष्ट्रपतींकडे दया याचिकाही दाखल केलेली नाही.
वकील ए.पी. सिंह यांचे म्हणणे आहे की, पवन गुप्ताने आपल्या याचिकेत पुन्हा एकदा घटनेप्रसंगी अल्पवयीन असल्याचा मुद्दा मांडला आहे. तसेच घटनेवेळी पवन गुप्ता हा १८ पेक्षा कमी वर्षाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तीन दोषींच्या फाशीचा रास्ता मोकळा
याच प्रकरणातील चार दोषींमधील मुकेश कुमार सिंह, विनय कुमार सिंह, अक्षय आणि पवन गुप्ता यांना फाशी होणार आहे. त्यातील तीन दोषींच्या फाशीचा रस्ता मोकळा झाला असून त्यांनी राष्ट्रपतींसमोर दया याचिकाही दाखल केलेली आहे. पण ती फेटाळली गेली. त्यामुळे आता मुकेश, विनय आणि अक्षय यांच्या फाशीचा रस्ता मोकळा झाला असून त्यांच्याकडे आता कोणताही पर्याय उरलेला नाही.