नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधील कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत असून भारतात चिकनची विक्री ५० टक्के कमी झाली आहे. त्यामुळे चिकनचे दर ७० टक्क्यांनी खाली आले आहेत. गोदरेज ऍग्रोवेटच्या एका एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सोशल मीडियावर अशा प्रकारे अंदाज लावला जात आहे की चिकनमुळे कोरोना व्हायरस पसरला असल्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात चिकनचे दर आणि विक्री दोनीही कमी झाले आहेत. तसेच एका प्रबंध निदेशक बी.एस. यादव यांनी सांगितले की, त्यांची पोल्ट्री शाखा गोदरेज टायसन फूडसला अडचणींचा सामना करावा लागला. कारण मागच्या महिन्यात त्यांच्या विक्रीत ४० टक्के कमी आली होती. या अगोदरच्या आठवड्यात ६ लाख कोंबड्यांची विक्री झाली होती, ज्यात खूपच घट झाली आहे. तसेच पुढच्या २-३ महिन्यात अफवा थांबल्या तर चिकनचा खप वाढेल आणि परत देशात चिकनची तुटवडा निर्माण होईल.
अफवा पसरावणाऱ्यांवर कारवाईची मागणी
या कारणामुळे किंमतींमध्ये मोठी वाढ होऊ शकते. यादव म्हणाले की, कोरोना विषाणू कोंबडीमुळे पसरत नाही असा सल्ला सरकारने दिला आहे. राज्य सरकारनेही अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करायला सांगितले आहे. चिकन भारतात खाणे सुरक्षित असून चिकनपासून पसरलेल्या कोरोनोव्हायरसच्या अफवांनी आपल्या देशात मागणी एका महिन्यातच ५० टक्क्यांहून अधिक कमी झाली आहे. बाजारभाव देखील ७० टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पहिल्या आठवड्यात ७.५ कोटी कोंबड्यांची विक्री
ते म्हणाले की, देशात एका आठवड्यात कोंड्याची विक्री ७.५ कोटींच्या तुलनेत ३.५. कोटी झाली आहे. गेल्या एका महिन्यात १०० रुपये किलो असलेली किंमत आता बाजारात ३५ रुपये प्रतिकिलोवर आली आहे. तर त्याची किंमत ७५ रुपये प्रति किलो आहे. यादव म्हणाले, ‘चिकनपासून कोरोनोव्हायरस पसरल्याच्या व्हाट्सऍपवरील अफवांमुळे संपूर्ण पोल्ट्री उद्योग आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. कोंबडीचे उत्पादन वाढले आहे, जे कमी किंमतीत बाजारात खपवले जात आहे.’