बहुजननामा ऑनलाईन टीम – Nick Bollettieri Death | क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आपल्या अकादमीमधून सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवा, आंद्रे अगासी असे महान टेनिसपटू जगासमोर आणणारे महान प्रशिक्षक कोच निक बोलेटिएरी यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. त्याच्या निधनाने टेनिस जगतावर शोककळा पसरली आहे. (Nick Bollettieri Death)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
निक यांची जागतिक टेनिसमध्ये अव्वल क्रमांकावर राहिलेले अनेक खेळाडू टेनिस जगताला देणारे प्रशिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. निक बोलेटिएरी यांनी 1978 मध्ये ‘निक बोलेटिएरी टेनिस अकादमी’ची स्थापना केली. सध्या ही अकादमी आयएमजी अकादमी म्हणून ओळखली जाते. या अकादमीतून जागतिक अव्वल दर्जाचे बरेच टेनिसपटू जगासमोर आले. यामध्ये सेरेना विल्यम्स तिची बहीण विनस विल्यम्स तसंच मारिया शारापोवा, आंद्रे अगासी यांचा समावेश आहे. (Nick Bollettieri Death)
कोच निक बोलेटिएरी यांच्या या कामगिरीमुळे 2014 मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. बऱ्याच स्टार टेनिस खेळाडूंनी निक यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत पोस्ट केल्या आहेत. जर्मन टेनिसपटू टॉमी हास याने त्याच्या बालपणीचा फोटो ज्यामध्ये निक आहेत, तो शेअर करत भावूक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Nick Bollettieri Death | celebrity tennis coach nick bollettieri died on monday at aged 91
हे देखील वाचा :
PAK vs ENG Test Match | रावळपिंडी कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानवर विजय मिळवत केले ‘हे’ 4 वर्ल्ड रेकॉर्ड
HC On Minor Girl Rape Case | ‘अल्पवयीन मुलीच्या संमतीने शरीरसंबंध हा बलात्कारच’ – उच्च न्यायालय
Gold Silver Prices | सोने, चांदीच्या दरांत मोठी घट