Gold Silver Prices | सोने, चांदीच्या दरांत मोठी घट

Gold Silver Prices | Gold and silver prices fall sharply

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय वायदेबाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने तसेच चांदीच्या किमतीत (Gold Silver Prices) मोठी घसरण झाली आहे. सराफा बाजारातदेखील चांदीचे दर घसरले आहेत. मंगळवारी सकाळी 09:05 पर्यंत देशांतर्गत वायदे बाजारात सोन्याच्या किमतीत (Gold Silver Prices) आधीच्या दरापेक्षा 387 रुपयांनी घसरून 53 हजार 463 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे, तर चांदीची किंमत 1258 रुपयांनी घसरून 65 हजार 191 प्रतिकिलो झाली आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतील सोमवारी तेजी दिसून आली. सोने 227 रुपयांनी वधारून 54 हजार 386 रुपयांवर बंद झाले. या आधीच्या सत्रामध्ये 54 हजार 159 रुपयांवर पोहोचले होते, तर दुसरीकडे चांदीने 1166 रुपयांची झेप घेत 67 हजारांपर्यंत मजल मारली होती.

 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 4.10 डॉलर (0.23 टक्के) वाढून 1773 डॉलर प्रतिऔंसवर ट्रेड करत आहे,
तर चांदीचे दर जवळपास स्थिर आहेत. तिची किंमत 0.11 डॉलर किंवा 49 टक्के वाढीसह 22.34 डॉलर
प्रतिऔंस या स्तरावर कायम आहेत. दसरा दिवाळीनंतर आता लग्नसराईचे दिवस सुरू झाल्याने सोने आणि चांदीचे दर वाढले आहेत. या काळात मोठ्या प्रमाणात सोन्या, चांदीची खरेदी होत असल्याने या दागिन्यांना भरपूर मागणी असते.

 

 

Web Title :- Gold Silver Prices | Gold and silver prices fall sharply

 

हे देखील वाचा :

Raj Thackeray | ‘आपण महापुरुषांना संकुचित दृष्टिकोनातून पाहतो’; महापरिनिर्वाणदिनी राज ठाकरेंचे जनतेला आवाहन

Pune Crime | धक्कादायक! बॅडमिंटनचे फूल काढताना वीजवाहिनीचा धक्का; मुलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू; लोणी काळभोर परिसरातील घटना

Mahaparinirvan Din – Gaurav More | महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेची महापरिनिर्वाणदिनी खास पोस्ट

Nashik ACB Trap | 51 हजारांची लाच स्वीकारताना ठेकेदार पोलिसांच्या जाळ्यात; नाशिकमधील प्रकार

Pimpri Fire | शाळेजवळील कंपनीला भीषण आग; 400 विद्यार्थ्यांना काढले बाहेर, आकुर्डीमधील घटना