इंदापूर : बहुजननामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – डिजिटल क्रांतीमुळे जग खुप जवळ आले असुन इंटरनेट, वेबसाइट, ई.मेल, फेसबुक हे आजच्या पिढीचे परवलीचे शब्द झालेले आहेत. मुक मॅसिव्ह, ओपन ऑनलाईन कोर्सेस, सारख्या नवनविन तंत्रज्ञानामुळे आपल्याला घर बसल्या विविध क्षेत्रातील ज्ञान ग्रहणाची संधी उपलब्ध होत असुन किंबहुना हे मुक कोर्सेस या जागतीक ज्ञानभंडाराचे प्रवेशद्वारच बनले असल्याचे मत प्राचार्य डाॅ. निर्मल साहु यांनी इंदापूर येथिल विद्याप्रतिष्ठान महाविद्यालयामध्ये बोलताना व्यक्त केले.
प्राचार्य डाॅ. निर्मल साहु हे विद्याप्रतिष्ठाणचे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभप्रसंगी बोलत होते.ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी काहीतरी ध्येय आपल्या मनामध्ये बाळगले पाहिजे.तरच त्याचे भविष्यातील करिअर यशस्वी होऊ शकनार आहे. महाविद्यालय अशा विद्यार्थ्यांसाठी चांगल्या नोकरीच्या, व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील या दष्टीने प्रयत्नशिल राहणार असल्याचे डाॅ. साहु यांनी सांगीतले.
यावेळी प्रा. ज्योती टेके यांनी प्रास्ताविक करताना महाविद्यालयात राबविल्या जाणार्या विविध शैक्षणिक व इतर उपक्रमां बाबतची माहीती उपस्थितांना सांगीतली. तर सन. २०१८-१९ या वर्षातील प्रथम व द्वितिय वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. आदेश बनकर, प्रा. सर्फराज शेख, प्रा. पवन मिश्रा, प्रा. सुदर्शन आवटे, प्रा. विजय शिंदे, प्रा. हणूमंत हेगडे, प्रा. गुरूदेव आरडे, प्रा. संदिप ननवरे, प्रा. गणेश साखरे, प्रा. तप्ती भोंग, प्रा. सतिश भोंग इत्यादी प्रमुख उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा. तमन्ना शेख व आभार प्रा. निलेश काळदाते यांनी मानले.