बहुजननामा ऑनलाईन – सभापती हे संसदेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. न्यूझीलंडच्या संसदेमधील सभापतींचे फोटो एका अगळ्यावेगळ्या कारणावरून चर्चेत आले आहे. न्यूझीलंडच्या संसदेचे कामकाज सुरु असताना सभापतीने एका महिला खासदाराच्या मुलाला संभाळताना दिसले आहे. महिला खासदाराच्या मुलाला बाटलीमधून सभापती दूध पाजतानाचा फोटो आणि व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.
Normally the Speaker’s chair is only used by Presiding Officers but today a VIP took the chair with me. Congratulations @tamaticoffey and Tim on the newest member of your family. pic.twitter.com/47ViKHsKkA
— Trevor Mallard (@SpeakerTrevor) August 21, 2019
न्यूझीलंडमधील वैरिकी येथील खासदार असणाऱ्या टॉम कॉफी हे आपल्या लहान बाळाला संसदेमध्ये घेऊन आले होते. संसदेमधील चर्चेत या महिलेने आपल्या बाळासहित सहभाग घेतला. मात्र जेव्हा अचानकच हे बाळ रडू लागल्यानंतर सभापती ट्रेवर मल्लार्ड यांनी संसदेचा कारभार आणि बाळाची देखभाल दोन्ही आपल्या हातात घेतले. यांनी आपल्या आसनावर बसूनच बाळाला मांडीवर घेतले. यादरम्यान ते बाळाला बाटलीतून दूध पाजता पाजता खासदारांचे म्हणणे ऐकत होते. या प्रसंगाचे फोटो ट्रेवरनि स्वतः आपल्या ट्विटरवरून शेअर केले आहे. यावेळी ते म्हणाले, सामान्यपणे सभापतीच्या खुर्चीवर केवळ सभापतीच बसतात. मात्र आज संसदेमध्ये एक खास पाहूणा आला होता. ज्याने माझ्यासोबत सभापतींची खुर्ची शेअर केली.
A photo of the Speaker of New Zealand's Parliament feeding a legislator's baby while carrying out his duties has been shared all over the world. pic.twitter.com/G8MvuuAOkb
— SBS News (@SBSNews) August 22, 2019
टॉम आणि टीम हे दोघे सरोगसीच्या माध्यमातून जुलै महिन्यामध्ये एका गोंडस मुलाचे पालक झाले आहेत. तर या प्रसंगानंतर ट्रेवर यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतामध्ये अजूनही संसदेत लहान मुलांना घेऊन जाण्याचा प्रकार घडला नसला तरी जगभरातील सनासदेमध्ये अनेक महिला खासदार आपल्या लहान मुलांना संसदेच्या सभागृहात घेऊन जाताना दिसतात.
What a powerful and soulful picture!!!
A lawmaker @tamaticoffey in New Zealand brought his baby to the parliament after coming back from paternity leave. The House speaker @SpeakerTrevor babysat for him during a debate. pic.twitter.com/KaqMyIYhdv
— Rema Rajeshwari Ramaswamy IPS (@rama_rajeswari) August 21, 2019
Amid so much bad news, here's something lovely. https://t.co/lKKpgsGq7E
— Carin Zissis (@CarinZissis) August 22, 2019
I love this! Way to be awesome @SpeakerTrevor! I love seeing some humanity in the vile and ugly business of politics! https://t.co/kcXnRt2Eso
— Richie Hardcore (@RichieHardcore) August 22, 2019
https://twitter.com/SnehaMKoshy/status/1164226416268890112
I love this! Way to be awesome @SpeakerTrevor! I love seeing some humanity in the vile and ugly business of politics! https://t.co/kcXnRt2Eso
— Richie Hardcore (@RichieHardcore) August 22, 2019