बहुजननामा ऑनलाइन टीम –नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी 6 कोटी ईपीएफ खातेधारकांना सरकारने चांगली बातमी दिली आहे. नवीन वर्ष देशातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या भेटवस्तू (EPFO account )आणू शकेल. खरं तर, आर्थिक वर्ष 20192-020 साठीच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 8.5 टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव सरकारने स्वीकारला आहे. गुरुवारी म्हणजेच 31 डिसेंबर 2020 पर्यंत ही व्याज रक्कम कर्मचार्यांच्या खात्यावर पोहचण्याची शक्यता आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, अर्थ मंत्रालयाला ईपीएफओला एक-वेळ 8.5 टक्के व्याज देण्यास परवानगी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या आठवड्यात या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती.
1. आपण या प्रकारे बॅलेन्स तपासू शकता
>> Epfindia.gov.in वर लॉग इन करा.
>> आपला यूएएन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड फीड करा.
>> ई-पासबुकवर क्लिक करा.
>> एकदा आपण सर्व तपशील प्रविष्ट केल्यास नवीन पेज उघडेल.
>> आता ओपन मेंबर आयडीवर क्लिक करा
>> आता आपण आपल्या खात्यात एकूण ईपीएफ शिल्लक पाहू शकता.
2. UMANG App च्या माध्यमातून EPF बॅलेन्स कसे तपासावे
>> UMANG अॅप उघडा
>> EPFO वर क्लिक करा
>> कर्मचारी केंद्र सेवांवर क्लिक करा
>> पासबुक पर्यायावर क्लिक करा
>> आपला यूएएन नंबर आणि पासवर्ड फीड करा
>> आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर तुम्हाला ओटीपी मिळेल
>> आता तुम्ही तुमचा EPFO बॅलेन्स तपासू शकता.
3. एसएमएसद्वारे तपासा बॅलेन्स
जर तुमचा यूएएन नंबर ईपीएफओमध्ये नोंदविला गेला असेल तर तुमच्या पीएफच्या शिल्लक माहिती माहिती मेसेजद्वारे प्राप्त होईल. यासाठी तुम्हाला 7738299899 वर EPFOHO UAN ENG (तीन अक्षरे भाषेसाठी) लिहून पाठवावी. तुमची पीएफ माहिती मेसेजद्वारे प्राप्त होईल. पीएफ बॅलन्ससाठी आपले यूएएन बँक खाते, पॅन आणि आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
4. मिस कॉलद्वारे शिल्लक जाणून घ्या
आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल द्या. यानंतर पीएफ तपशील ईपीएफओच्या मेसेजद्वारे उपलब्ध होतील. येथे आपला यूएएन, पॅन आणि आधार लिंक असणे देखील आवश्यक आहे.
पीएफ खात्यातून किती पैसे काढू शकता?
पीएफ खात्यातून संपूर्ण पैसे काढणे केवळ दोन परिस्थितीत केले जाऊ शकते. सेवानिवृत्तीनंतर किंवा जर कर्मचारी दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार असेल. जर ईपीएफ सदस्य एका महिन्यासाठी बेरोजगार राहिला तर त्याच्या एकूण पीएफ रकमेपैकी 75 टक्के रक्कम पेन्शन फंडामधून काढता येईल.