नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लवकरच २० रुपयांची नोट नवीन रंग आणि नवीन आकारात बाजारात येणार आहे. या नोटमध्ये सध्याच्या चलनात असलेल्या नोटपेक्षा काही वेगळे बदल करण्यात आले आहेत. या नोटचा रंग आता पिवळा असणार आहे.
मिडिया रिपोर्टसनुसार पहिल्या नोटांची खेप कानपूर येथील रिझर्व बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात आली आहे. लवकरच या नोटा बँकांमध्ये पोहोचविल्या जाणार आहेत.
हे आहेत नवी नोटमधील बदल
महात्मा गांधी यांच्या सीरीजमधील या नोटवर गर्वनर शशिकांत दास यांचे हस्ताक्षर असणार आहेत. तर या नोटचा रंग पिवळा असले. त्यासोबतच नोटच्या पाठीमागे भारताचा सांस्कृतिक वारसा दाखविणाऱ्या महाराष्ट्रातील औऱंगाबादजवळ असलेल्या एलोरा लेण्यांचे चित्र असेल.
या नोटचा आकार आधीच्या नोटपेक्षा थोडा लहान आहे. जुन्या नोटच्या तुलनेत तो २० टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. हा आकार ६३mm * १२९ mm एवढा असेल.
८ नोव्हेंबर २०१६ साली नोटबंदी केल्यानंतर चलनात बदल करण्याची मालिका अजून सुरु आहे. यापुर्वी बाजारात २०००, ५००, २००, १००, ५० आणि १० रुपयांचे नोट नवीन रुपात आले आहेत.