बहुजननामा ऑनलाईन टीम : इंडियन आयडल (Indian Idol) ची जज फेमस सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) सोशलवर सुपरअॅक्टीव असते. सोशलवर ती अनेकदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. यामुळं ती कायमच चर्चेत असते. आता नेहानं तिच्या चाहत्यांना खुशखबरी दिली आहे. नेहा लवकरच आई होणार आहे. सोशलवरून तिनं याबाबत माहिती दिली आहे.
नेहानं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे यात. ती पती आणि पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंग (Rohanpreet Singh) सोबत दिसत आहे. फोटोत दोघांचा रोमँटीक अंदाज पहायला मिळत आहे. खास बात अशी की, फोटोत नेहा प्रेग्नंट दिसत आहे. तिनं खास पोज देत बेबी फ्लाँट केलं आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे.
नेहाचा हा फोटो समोर आल्यानंतर आता चाहते हैराण झाले आहेत. एवढ्या लवकर नेहा प्रेग्नंट कशी असाही सवाल अनेकांनी केला आहे. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांनी दि 24 ऑक्टोबर 2020 रोजी (वार- शनिवार) लग्न केलं. त्यामुळं त्यांच्या लग्नाला दोन महिनेही पूर्ण झालेले नाहीत. हेच कारण आहे की, नेहाचा हा फोटो प्रत्येकजण चकित होत आहे.
नेहाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.