बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने केली आहे. त्याने ट्विट करत केंद्र सरकारला परीक्षा पुढे ढकलली जावी अशी विनंती केली आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांचा जीव संकटात टाकू नये असेही म्हटले आहे.
It's my request to government of India, to postpone the #Neet/#JEE exams in the current situation of the country! In the given #COVID19 situation, we should care utmost & not risk the lives of students! #PostponeJEE_NEETinCOVID@EduMinOfIndia @PMOIndia
— sonu sood (@SonuSood) August 25, 2020
देशातील सध्याची परिस्थिती पाहता जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलली जावी अशी माझी भारत सरकारला विनंती आहे. सध्याच्या कोरोना स्थितीत आपण विद्यार्थ्यांबद्दल जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. अशी मागणी केली आहे. दरम्यान, परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीतही न्यायालयाने परीक्षा घेतली पाहिजे असा निर्वाळा दिला आहे. यादरम्यान स्वीडनची 17 वर्षीय पर्यावरण प्रेमी ग्रेटा थनबर्गने हिनेही परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका केली आहे..संकटात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सांगणे अन्यायकारक असल्याचे ग्रेटा थनबर्गने म्हटले आहे.
राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा वेळेतच होणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) सांगण्यात आले आहे. एनटीएने जेईई मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. जेईई मुख्य परीक्षेसोबत नीट परीक्षाही वेळेतच होणार आहे. ही परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे.