Market Yard Pune Crime News | पुणे : अश्लील स्पर्श करुन तरुणीचा विनयभंग, ज्येष्ठ नागरिकाला अटक

May 22, 2024

पुणे : – Market Yard Pune Crime News | भावी पतीसोबत भाजी आणण्यासाठी गेलेल्या तरुणीला अश्लील स्पर्श करुन विनयभंग केल्याची घटना मार्केट यार्ड परिसरात घडली आहे (Molestation Case). याप्रकरणी एका 55 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.21) सकाळी नऊ ते सडेनऊ या दरम्यान घडला आहे. याबाबत 26 वर्षीय तरुणीने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीडितेच्या तक्रारीवरुन नारायण वाघू मळेकर Narayan Waghu Malekar (वय-55 रा. गणपतनगर, बिबवेवाडी) याच्यावर आयपीसी 354, 354(ब) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी तिच्या होणाऱ्या पतीसोबत मार्केट यार्ड येथे भाजी आणण्यासाठी गेली होती. भाजी खरेदी करत असताना आरोपीने समोरून येऊन फिर्यादी यांना अश्लील स्पर्श करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अश्लील बोलून जीवे मारण्याची धमकी

कोंढवा : महिलेच्या मोबाईलवर फोन करुन अश्लील बोलून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार कोंढवा येथे घडला आहे. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने कोंढवा पोलिसांकडे (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन 88085XXXXX मोबाईल धारकावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 7 मे रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडला आहे. आरोपीने फिर्यादी यांना फोन करुन अश्लील संभाषण केले. तसेच मुलीबाबत अश्लील बोलून फिर्य़ादी व मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने वारंवार फोन केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Maharashtra 12th HSC Results 2024 | 12 वी च्या परीक्षेत यंदाही मुलींची बाजी, एकुण निकाल 93.37 टक्के, कोकण विभाग अव्वल