पुणे : बहुजननामा ऑनलाईन – घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात केंद्र सरकारने केलेल्या प्रचंड दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी खासदार गिरीश बापट यांच्या घरासमोर चूल पेटवून आंदोलन केले. ‘गिरीष बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवाढ कमी करावी असे सांगावे” अशी मागणी आंदोलक महिलांनी केली आहे. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीचा निषेध करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांच्या मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
यावेळी पोलिसांनी आंदोलक महिलांच्या चुली ताब्यात घेऊन त्या परत दिल्या. अखेर पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून महिला कार्यकर्त्यांनी आता शनिवार पेठ पोलीस चौकीत आंदोलन सुरू आहे. पुण्यातील विविध भागात हे आंदोलन सुरु आहे. महात्मा फुले मंडई येथे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. तर वैशाली नागवडे यांच्या उपस्थितीमध्ये बापट यांच्या घरासमोर आंदोलन सुरु होते. अखेर पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून शनिवार पेठ पोलीस चौकीत आंदोलन सुरू आहे.