बेंगळुरु : वृत्तसंस्था – जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी बुधवार म्हटले की, जागतिक महामारी कोविड-19 ची मर्यादित संख्येतील वॅक्सीन प्रामाणिकपणे सर्वांपर्यंत पोहचवणे खुप मोठे आव्हान आहे. विशेषकरून, कमी उपलब्ध असलेल्या या वॅक्सीनवर संपन्न देशांनी आपला कब्जा करूनये, या गोष्टीकडे सुद्धा पूर्ण लक्ष ठेवावे लागेल.
2021 च्या प्रारंभी मिळेल शुभवार्ता
2021 च्या सुरूवातीला कोरोना वॅक्सीनबाबत चांगली बातमी समजू शकते, असे सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले. परंतु, यांनतर मोठे आव्हान हे असेल की, आपण तिचे संपूर्ण जगात प्रमाणिकपणे वितरण करणे. हे श्रीमंत देशांना मर्यादित वॅक्सीनवर कब्जा करू न देता, ते करावे लागेल.
वॅक्सीन उत्पादनाचा हब आहे भारत
त्यांनी बंगळुरूमध्ये झालेल्या एका व्हर्च्युअल संमेलनात म्हटले की, भारत वॅक्सीन उत्पादनाचे हब आहे. भारत याबाबतीत चांगल्या मार्गावर आहे, कारण अनेक कंपन्या यावर काम करत आहेत आणि अनेक कंपन्या परदेशी संस्थांसोबत काम करत आहेत.
या टप्प्यात मृत्युदर अधिक वाढणार नाही
या महामारीशी लढण्यासाठी संस्थांना अधिक सक्षम करण्याची गरज आहे. कारण आजार संपूर्ण जगात विषम प्रकारे पसरला आहे. या महामारीच्या दुसर्या टप्प्यात मृत्युदर जास्त वाढणार नाही. आम्हाला आतापर्यंत हे कळले नाही की, युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत दक्षिण आशिया आणि अफ्रीकामध्ये मृत्युदर इतका कमी का आहे.
भारतात तीन वॅक्सीनचे परिक्षण
भारतात तीन वॅक्सीनचे सध्या परिक्षण सुरू आहे. सीरम इन्स्टीट्यूटच्या वॅक्सीनची 2 (बी) फेज आणि 3 फेजची टेस्ट सुरू आहे. भारत बायोटेक आणि जायडस कॅडिलाच्या वॅक्सीनने 1 फेजची टेस्ट पूर्ण केली आहे. रशिया निर्मित स्पुतनिक -5 वॅक्सीनसाठी भारत आणि रशियामध्ये चर्चा सुरू आहे. काही प्राथमिक माहितीची देवाण-घेवाण झाली आहे.